
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा उद्या, 4 मार्चपासून सुरू होणार आहे. यंदा या परीक्षेसाठी एकूण 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी यंदा परीक्षा केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. राज्यातील 2 हजार 996 मुख्य केंद्रे तर 6 हजार 639 उपपेंद्रे असे मिळून एकूण 9 हजार 635 परीक्षा पेंद्रांवर परीक्षा होणार आहे.
मुंबई विभागातून 3 लाख 30 हजार 105 परीक्षार्थी
मुंबई विभागीय शिक्षण मंडळातून यंदा 3 लाख 30 हजार 105 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. यांपैकी 175374 मुले, 154712 मुली तर 19 ट्रान्सजेंडर विद्यार्थी आहेत. यांपैकी 97 हजार 922 विद्यार्थी विज्ञान शाखेतील, 49 हजार 925 कला, 1,77,721 विद्यार्थी वाणिज्य तर व्यावसायिक अभ्यासक्रम आणि टेक्निकल सायन्स शाखेतील अनुक्रमे 4460 आणि 77 विद्यार्थी आहेत. मुंबई विभागातील 505 परीक्षा पेंद्रांवर ही परीक्षा होईल.




























































