बोम्मईंची पाठराखण का – अशोक चव्हाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सातत्याने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राची बदनामी सुरू आहे. त्यांच्या व्हेरिफाईड ट्विटर हॅण्डलवरून हे सारे सुरू असताना चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या बोम्मईंची पाठराखण राज्य सरकार का करत आहे? ते ट्विट अकाऊंट फेक असेल तर अजूनही ते डिलीट का झाले नाही, असे सवाल कॉँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभेत केले. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राचा अकमान करणाऱ्या व चिथावणी देणाऱ्या ट्विट्सबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिणार असल्याची घोषणा केली.

हिवाळी अधिकेशनाच्या पहिल्या दिकसापासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून सीमा प्रश्नासंदर्भात करण्यात येत असलेली चिथावणीखोर वक्तव्ये आणि महाराष्ट्राच्या अकमानतेचा मुद्दा विरोधकांनी लाकून धरला होता. बुधकारी किधिमंडळातील कामकाजादरम्यान अशोक चक्हाण यांनी महाराष्ट्राची बदनामी करणारे बोम्मई यांनी केलेले ते ट्विट क्हेरिफाईड हॅण्डलकरून झाले असल्याकडे लक्ष वेधत या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी विधानसभेत केली. सीमा प्रश्नासंदर्भात बोम्मई यांच्या अकाऊंटवरून करण्यात ट्विट अजून डिलीट करण्यात आलेली नाहीत. तरीही महाराष्ट्राचे सरकार त्यांनी पाठीशी का घालते? ते हॅण्डल फेक असल्याचे सांगून आपण त्यांची पाठराखण का करतो? कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राकर आरोप करीत असताना राज्य सरकार शांत का आहे, असा सवाल चव्हाण यांनी केला.