कोरोनामुळे वाहन विक्रीला ब्रेक, एप्रिलमध्ये 7% हून खाली घसरण

लॉकडाऊनचा फटका सर्वच उद्योग धंद्यांना बसला आहे. आधीच संकटात असलेल्या वाहन उद्योगासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. एप्रिल महिन्यात वाहन विक्री तर 7% हून खाली घसरल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र वाहतूक विभागाने ही माहिती दिली असून एप्रिल महिन्यात 27,278 वाहनांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी (एप्रिल 2019) याच कालावधीत 4 लाख वाहनांची नोंदणी झाली होती. म्हणजे यंदाची वाहन नोंदणी ही 7% पेक्षा खाली घसरली आहे.

वाहतूक नोंदणीच्या डेटानुसार यंदा एप्रिल – मे मध्ये राज्यातील 50 केंद्रांवर एकूण 27,278 वाहने नोंदवण्यात आली आहेत. कोरोनामुळे करणयात आलेल्या लॉकडाऊनमुळे वाहन विक्रीवर हा परिणाम झाला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

एप्रिल – मे महिन्यात वाहतूक नोंदणी विभागाला 95.71 कोटी रुपये महसूल मिळाला. गेल्या वर्षी 1,339.67 कोटी रुपये महसूल मिळाला होता. यांपैकी अनेक वाहने ही दोन महिने आधीच नोंदवण्यात आले होते. मात्र पुढील महिन्यात लॉकडाऊनमुळे ग्राहकांना चौकशी करणे, सेंटरवर भेट देणे, कर्ज मिळवणे, तसेच कागद पत्रांसाठीच्या प्रक्रिया या सर्वांसाठी उशीर होत असल्याने अनेकांनी पाठ फिरवली. तसेच अनेकांच्या पगारावर याचा परिणाम झाला असल्याने वाहन खरेदीचेही त्यांनी लांबणीवर टाकले आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम गेल्या दोन महिन्यात दिसला आहे.

एप्रिल – मे महिन्यात खरेदी करण्यात आलेल्या 24,649 गाड्या या कार, दुचाकी आहेत. तर 2,629 वाहने ट्रक किंवा कमर्शिअल प्रकारात मोडतात. या दोन महिन्यात सर्वाधिक विक्री ही दुचाकी वाहनांची झाली आहे. 20,590 दुचाकी, 3,914 कार विक्री झाली. 50 विभागांपैकी पुण्यात 1,792 वाहनं विकिली गेली.

आपली प्रतिक्रिया द्या