महाराष्ट्र मिनी ऑलिंपिक योगस्‍पर्धा 3 जानेवारीपासून अन् सायकलिंगच्या स्‍पर्धा 5 जानेवारीला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र मिनी ऑलिंपिक स्‍पर्धांतर्गत नाशिक जिल्‍ह्‍यात दोन क्रीडा प्रकाराच्‍या स्‍पर्धा होणार आहेत. योगाची स्‍पर्धा ३ जानेवारीपासून तर सायकलिंग स्‍पर्धा ५ जानेवारीला पार पडणार आहे. या स्‍पर्धेनिमित्त क्रीडा ज्‍योत रॅलीचे आयोजन केले आहे. नाशिकचे जिल्‍हाधिकारी म्‍हणाले, की रॅली व स्‍पर्धेचे संपूर्ण नियोजन जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत झालेले असून, रॅलीमध्ये नाशिकमधील खेळाडूंचा सहभाग असणार आहे. राज्‍यस्‍तरीय स्‍पर्धेनिमित्त राज्‍यभरातील खेळाडू नाशिकला येत आहेत. प्रभारी जिल्‍हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे म्‍हणाले, की योग स्‍पर्धेसाठी २ जानेवारीला राज्‍यभरातील खेळाडू दाखल होतील. विभागीय क्रीडा संकुलात ३ व ४ जानेवारीला ही स्‍पर्धा पार पडेल. ५ जानेवारीला पारितोषिक वितरण समारंभ होईल. सायकलिंग स्‍पर्धा शिर्डी ते सिन्नर यादरम्‍यानच्‍या समृद्धी महामार्गावर होणार आहे. टाईम ट्रायल प्रकारात पुरुष गटाची ४० किलोमीटर, महिला गटाची ३० किलोमीटर तर मासस्‍टार्ट प्रकारात पुरुषांसाठी ६० किलोमीटर व महिला गटासाठी ४० किलोमीटर अंतराची सायकलची शर्यत होईल.