
राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारी रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच राज्यभरात जवळपास 60 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या उमेदवारांच्या बिनविरोध निवडीसाठी कुणाचा दबाव होता की स्वखुशीने विरोधी उमेदवारांने माघार घेतली याची तपासणी राज्य निवडणूक आयोगाकडून केली जाणार असल्याची माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
महापालिका निवडणुकीत राज्यभरात सत्ताधारी पक्षाच्या 60 पेक्षा जास्त उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. या बिनविरोध निवडीवरून सर्वत्र टीकेची झोड उठवली जात असून, निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बिनविरोध निवडीवरून संबंधितांवर कारवाईची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील बिनविरोध निवडणुकीला न्यायालयात आव्हानदेखील देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमार यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत ज्या ठिकाणी बिनविरोध निवडी झालेल्या आहेत, तेथील अहवाल मागवले आहेत. हा अहवाल आल्यानंतर त्यात प्रामुख्याने उमेदवारी माघारीसाठी कुणाचा दबाव होता, पैशाचे आमिष देण्यात आले होते की स्वखुशीने माघार घेतली यासंदर्भात तपासणी करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या चार गोष्टी तपासल्या जाणार?
जो उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे त्या उमेदवाराने इतर उमेदवारांवर काही दबाव आणला होता का?
ज्या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली, त्यांच्यावर काही दबाव होता का? किंवा त्यांना काही आमिष दाखवलं होतं का?
उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणि आमिष दाखवल्याबाबत पोलिसांत तक्रार दिली होती का? याबाबत आणखी कोणाच्या काही तक्रारी आहेत का?
ज्या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली त्याने ती स्वखुशीने माघार घेतली का या गोष्टींची अहवालात पाहणी करण्यात येणार आहे.
या बातमीसाठी इंग्रजी छोट्या लिपीमध्ये Url आणि SEO लिहून द्या.


























































