
देशात महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट न्यायव्यवस्था आहे. नागरिकांना न्याय देण्यात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. हिंदुस्थानी न्याय अहवालात हे नमूद करण्यात आले आहे.
केंद्रिय न्याय विभागाने एक कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांचा अभ्यास केला. त्यात पोलीस, न्याय व्यवस्था, तुरुंग प्रशासन आणि कायदेशीर सहायता हे निकष ठेवण्यात आले होते. यात महाराष्ट्राचा क्रमांक प्रथम आहे. महाराष्ट्रानंतर केरळ, तमिळनाडू पंजाब आणि हरयाणाचा क्रमांक लागतो. महाराष्ट्र चारही निकषात न्यायदान चांगले होते असा निष्कर्ष अहवालात नमूद करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रात या चारही विभागांचे एकमेकांशी चांगले सहकार्य असल्याचेही म्हटले आहे.
अहवालातील प्रमुख निष्कर्ष
- देशात 18 हजार 200 जज आहेत, परंतु अजूनही 23 टक्के जागा रिक्त आहेत.
- न्यायव्यवस्थेत महिलांचे प्रमाण कमी आहे. तसेच पोलीस विभागात महिलांचे प्रतिनिधित्व फक्त 7 टक्के आहे.
- देशात सर्वच तुरुंगात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. सरासरी 114 टक्के कैदी तुरुंगात आहेत.
- पोलीस, तुरुंग आणि न्यायव्यवस्थेत अजूनी मनुष्यबळांची संख्या कमी आहे.
- गेल्या पाच वर्षात देशातील अर्ध्या राज्यांनीच रिक्त पदे भरण्याचा प्रयत्न केला आहे.



























































