
महाराष्ट्र प्राध्यापक सेना संघटनेचे पदाधिकारी व संघटनेचे कायदेविषयक सल्लागार यांनी ’मातोश्री’ येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्राध्यापकांच्या कामाचे कौतुक केले. ’देशासाठी सुजाण नागरिक घडविण्याचे कार्य प्राध्यापक करीत असतात. सामाजिक – राजकीय परिस्थितीवर योग्य भाष्य करण्याची कुवत प्राध्यापकांमध्ये असते. हे कार्य सर्व प्राध्यापक निष्ठापूर्वक करतील’ असे गौरवोद्गार काढले. ’प्राध्यापकांनी तरुण पिढीला समाजाभिमुख, सकारात्मक, वास्तववादी भाष्य करण्याएवढे सक्षम बनवावे’, असे आवाहनही केले. या प्रसंगी महाराष्ट्र प्राध्यापक सेनेचे अध्यक्ष डॉ. धनराज कोहचाडे यांनी संघटनेच्या कार्याची माहिती उद्धव ठाकरे यांना दिली.































































