विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे 5 किलोपर्यंतच, प्रकाशकांना पुस्तकावर वजन छापावे लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दप्तराच्या ओझ्याने वापून गेलेल्या विद्यार्थ्यांना आता यापासून दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नव्या धोरणानुसार दप्तराचे ओझे फक्त पाच किलो राहणार आहे. विशेष म्हणजे दप्तराचे वजन मोजण्यासाठी प्रत्येक शाळेत तराजू ठेवण्यात येणार असून प्रकाशकांनाही पुस्तकावर वजन छापणे बंधनकारक करण्यात आले आहे. होमवर्कचेही वेळापत्रक या धोरणात ठरविण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने बुधवारी आपले नवे दप्तर धोरण जाहीर केले. यात दप्तराच्या ओझ्यापासून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना साधारण पाच किलोपर्यंत दप्तर असणे बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन मोजण्यासाठी प्रत्येक शाळेत भारमापक ठेवण्यात येणार आहे. शाळांना दप्तरांची नियमित तपासणी करावी लागणार आहे. पेंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्यांना आणि पेंद्रशासित प्रदेशांना या निर्णयाची सक्तीने अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे.

असे आहे धोरण

  • पहिलीतील विद्यार्थ्यांसाठी दप्तरात तीन पुस्तके असतील आणि त्यांचे वजन 1078 ग्रॅम असेल.
  • बारावीतील विद्यार्थ्यांसाठी दप्तरात सहा पुस्तके असतील आणि त्यांचे वजन 4182 ग्रॅम असेल.
  • शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरातील पुस्तकांचे वजन 500 ग्रॅम ते 5 किलो एवढेच असेल. वहय़ांचे वजन 200 ग्रॅम ते 2.5 किलो एवढेच असेल.
  • दप्तराच्या पाच किलो वजनात जेवणाचा डबा आणि पाण्याच्या बाटलीचे वजनही मोजले जाईल.

असे आहे होमवर्कचे वेळापत्रक

दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना होमवर्क नाही  तिसरी ते सहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आठवडय़ातून दोन तासच होमवर्क सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दररोज एक तास होमवर्क नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन तास होमवर्क