शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय जाहीर करा

200

राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांत 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरवदिन मोठय़ा उत्साहात साजरा केला जाणार आहे. या दिवसाचे औचित्य साधून सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबतचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे शिवसेना आमदार विलास पोतनीस यांनी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा दर्जा’ देण्यासंदर्भात सुरू असलेल्या प्रयत्नांबाबतही पोतनीस यांनी आभार मानले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या