
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यापल आचार्य देवव्रत यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यांनी अजित पवारांकडे आपला राजीनामा दिला होता. अजित पवार यांच्याकडेच माणिकराव कोकाटे यांच्याकडील सर्व खात्यांची जबाबदारी असणार आहे.
दरम्यान, शासकीय कोट्यातील सदनिका घोटाळाप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवले असून, प्रथम वर्ग न्यायालयाने ठोठावलेली दोन वर्षे कारावासाची शिक्षा कायम ठेवली आहे. यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यातच आज त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.


























































