राज्यात 9305 शाळाबाह्य मुले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात 4650 मुले आणि 4675 मुली अशी 9305 बालके शाळाबाह्य आढळून आल्याची माहितीही शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली. 5 जुलै ते 20 जुलै 2022 दरम्यान मिशन झिरो ड्रॉप आऊट मोहीम राबवण्यात आली. त्या मोहिमेदरम्यान ही शाळाबाह्य मुले आढळली असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळाबाह्य मुलामुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हक्क कायदा, समग्र शिक्षण योजना, बेटी बचाव-बेटी पढाव व मध्यान्ह भोजन यासारख्या योजना प्रभावीपणे राबवल्या जातात, असा दावा त्यांनी केला. मात्र मध्यान्ह भोजनात मुलांना दिली जाणारी खिचडी इतकी कडक असते की दगडाने पह्डावी लागते, अशी वस्तुस्थिती सत्ताधारी पक्षाचेच आमदार सुनील राणे यांनी सभागृहात मांडली. बरोबरच आदिवासी भागातील शाळांना पावसाळ्यात गळती लागली असून त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.