
राज्यात चाचण्या आणि रुग्ण संपर्कातील लोकांचा शोध सुरू झाल्याने कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. दिवसभरात 20 हजार 489 रुग्णांची नोंद झाली असून 10 हजार 801 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत 6 लाख 36 हजार 574 रुग्ण बरे झाले असून 2 लाख 20 हजार 661 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आज 312 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.97 टक्के एवढा आहे.
मुंबईत 1735 नवे कोरोनाबाधित; 33 जणांचा मृत्यू
मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची 1735 इतकी मोठी वाढ नोंदवली गेली. तर 33 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईत एकूण रुग्णसंख्या 1,53,712 झाली आहे. मात्र यातील 1 लाख 22 हजार 567 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मुंबईत आतापर्यंत मृतांचा आकडा 7829 वर पोहचला आहे. दरम्यान, आज 896 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.




























































