राज्यात लघु जलविद्युत प्रकल्पांची पॉवर वाढणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात आता लघु जलविद्युत प्रकल्पांची पॉवर वाढणार आहे. 25 मेगावॅटपेक्षा कमी क्षमता असलेले पण 30-35 वर्षे वय झालेल्या प्रकल्पांचे आधुनिकीकरण करणे, खासगीकरणातून नवीन प्रकल्प विकसित करण्यासाठी तांत्रिक छाननी समिती नेमली आहे.

त्यामुळे प्रलंबित वीज प्रकल्पांची कामे वेळेत मार्गी लागणार असल्याने लघु जलविद्युत प्रकल्पांची वीजनिर्मिती क्षमता 250 मेगावॅटहून पुढे वाढत जाणार आहे.

राज्यात 36 जलविद्युतनिर्मिती प्रकल्प असून त्यांची एकूण क्षमता 2600 मेगावॅटच्या घरात आहे. त्यामध्ये एकटय़ा कोयना वीज प्रकल्पाची क्षमता 1920 मेगावॅट आहे.

त्यामुळे उर्वरित प्रकल्पांची क्षमता 700 मेगावॅट एवढी कमी आहे. त्यामध्ये वाढ करण्यासाठी सरकारने 25 मेगावॅटपेक्षा कमी क्षमतेच्या पण वय झालेल्या भाटघर, वीर, येलदरीसह अन्य लघु जलविद्युत प्रकल्पांचे आधुनिकीकरण करणे, पूरक भौगोलिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी खासगीकरणातून 25 मेगावॅटपर्यंत क्षमतेचे नवीन जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

त्यानुसार प्रकल्प उभारणीकरिता राबविण्यात येणाऱया निविदांप्रकरणी पाश्चत अर्हता पद्धतीचा अवलंब करून मागवलेल्या निविदांच्या तांत्रिक छाननीसाठी जलविद्युत विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती नेमली आहे.

लघु जलविद्युत प्रकल्पांवरच भिस्त

राज्यात 25 मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेचे जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी नैसर्गिक पूरक भौगोलिक परिस्थिती असणे आवश्यक आहे. पण सध्या राज्यात मोठय़ा प्रकल्पांसाठी पूरक परिस्थिती नाही.

त्यामुळे वीज निर्मितीसाठी मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी पृत्रीमरीत्या पूरक परिस्थिती निर्माण करून लघु जलविद्युत प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. त्यानुसार सरकारने खासगीकरणातून जलविद्युत प्रकल्प उभारण्यावर भर दिला आहे.