राज्यात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ, आकडा पोहोचला चारशेच्या आसपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील वाघांची संख्या चारशेच्या आसपास गेली आहे. 2014 च्या तुलनेत वाघांची संख्या गेल्या 8 वर्षात दुपटीने वाढली आहे. महाराष्ट्रातील व्याघ्रप्रेमींसाठी ही आनंदाची बाब आहे.

2014 मध्ये महाराष्ट्रात 190 वाघ होते. आज ही संख्या चारशेच्या आसपास आहे. त्यातही एकट्या ताडोबा प्रकल्पातच दोनशेहून अधिक वाघ आहेत. उर्वरित वाघ पेंच, बोर, उमेर-कऱ्हांडला, नवेगाव-नागझिरा, सह्याद्री क्षेत्र, गडचिरोली या जंगलांमध्ये असल्याची नोंद आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढा विदर्भाच्या दिशेने जास्त आहे..