वज्रेश्वरी मंदिरातील दानपेटीवर डल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
robbery in vajreshwari temple

सामना ऑनलाईन, ठाणे

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वज्रेश्वरी मंदिरावर पहाटे सहा सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकून पाच दानपेटय़ांवर डल्ला मारला. त्यातील बारा लाख रुपये लांबवून दरोडेखोर पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या दरोडय़ामुळे लाखो भाविकांमध्ये तीक्र संताप व्यक्त होत असून या घटनेच्या निषेधार्थ आज वजेश्वरीत कडकडीत बंद पाळण्यात आला. यापूर्वी येथे दरोडा टाकण्यात आला असून यानिमित्ताने वजेश्वरी देवीच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

3 ते 5 मे दरम्यान नुकताच वज्रेश्वरी देवीचा यात्रोत्सव पार पडला होता. या उत्सवाच्या वेळी भाविकांनी भरभरून पेटीमध्ये दान टाकले.  दरोडेखोरांनी या उत्सवामध्ये येऊन मंदिराची व परिसराची रेकी केली असावी असा पोलिसांचा संशय आहे.