राज्यात 16 जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह

राज्यात दरवर्षी 10 जून रोजी ‘दृष्टी दिन’ साजरा करण्यात येतो. यंदाही यानिमित्त 16 जूनपर्यंत ‘दृष्टी दिन’ सप्ताह साजरा केला जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. या काळात कोरोनापश्चात होणाऱया म्युकरमायकोसिस आजाराबाबत जनजागृती करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

या सप्ताहानिमित्त राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध आणि उपचार कार्यक्रमांतर्गत मधुमेह रुग्णांकरिता नेत्र तपासणी शिबीर आयोजित करून रुग्णांची तसेच म्युकरमायकोसिस झाल्यास डोळ्यांची निगा कशी राखावी याचे मार्गदर्शन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

‘असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी’

शासकीय सेवेतील नेत्र शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांनी अहोरात्र काम केले. खडतर परिस्थितीवर मात करून त्यांनी जिद्द व चिकाटीच्या बळावर 80 हजारांहून अधिक नेत्र शस्त्र्ाक्रिया पूर्ण करून नेत्रहीनांचे जीवन प्रकाशमय केले. त्यांचा जन्म आणि मृत्यू दिनांक 10 जून आहे. म्हणून राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी 10 जून हा दिवस डॉ. भालचंद्र स्मृतिनिमित्त ‘दृष्टी दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त सामान्य जनतेमध्ये नेत्रदानाबाबत जनजागृती केली जाते. ‘असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी’ या घोषवाक्याचा आधार घेत जाणीवजागृतीचे प्रयत्न सुरू आहेत.

कोरोनाकाळात 2 लाख 28 हजार मोतिबिंदू शस्त्रक्रीया

राज्यात 69 नेत्रपेढय़ा, 167 नेत्र संकलन पेंद्र कार्यरत आहेत. मार्च 2020 पासून कोरोना महामारीशी लढा देत आहोत. राज्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी कोरोना महामारीमध्ये कार्यरत असूनदेखील त्यांनी 2 लाख 28 हजार इतक्या मोतिबिंदू शस्त्र्ाक्रिया केल्या. 1355 नेत्र बुब्बुळे संकलन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या