राष्ट्रीय शालेय कराटे स्पर्धा: महाराष्ट्राचे घवघवीत यश

350

मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंना एक सुवर्ण, नऊ रौप्य व सात कांस्य पदकांवर मोहोर उमटवण्यात यश लाभले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, सचिव संदीप गाडे व सचिव परमजित सिंग व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अरविंद चव्हाण ,सतीश पाटील, राजेश गाडे, विभावली सापळे, संध्या पवळे, तीतीक्षा डंभे, व्यवस्थापक आनंद भुसारी व किशोर चौधरी यांचे मार्गदर्शन संघाला लाभले.

14 वर्षांखालील मुली: तन्वी शेंडकर – रौप्य पदक- श्रेया डोम्बल – रौप्यपदक- सानिका नाईक – रौप्यपदक- गौरी कल्याणकर – रौप्यपदक-

17 वर्षांखालील मुली : तेजश्री कत्रे – रौप्यपदक- आर्य वैद्य – रौप्य पदक- हर्षिता उचलपती – कांस्यपदक 

17 वर्षांखालील मुले : आदित्य धसाडे – कांस्यपदक रोशन साफी – रौप्यपदक प्रद्युम्न म्हात्रे – सुवर्णपदक

आपली प्रतिक्रिया द्या