
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट संचालित राजे शिवाजी विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय तसेच मनोहर जोशी महाविद्यालय येथे ‘उड्डाण’ या वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. धारावीतील ट्रस्टच्या पीएमजीपी कॉलनी येथील भव्य प्रांगणात हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
‘उड्डाण’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित कव्वाली तसेच सावित्रीबाई फुले यांचे मुलींच्या शिक्षणातील योगदान, नारीशक्ती, वृद्धाश्रमांचा वाढता कल व मोबाईलचे वाढते व्यसन अशा विविध सामाजिक तसेच ज्वलंत विषयांवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या महोत्सवाला आयकर अधिकारी रामकृष्ण झा, नगरसेविका आशा काळे, धारावीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर, डब्ल्यूपीपी स्वयंसेवी संस्थेच्या रमा तसेच ट्रस्टचे अध्यक्ष बाबूराव माने उपस्थित होते.
संस्थेचे सचिव दिलीप शिंदे, ट्रस्टचे कोषाध्यक्ष प्रमोद माने, मुख्याध्यापिका वीणा दोनवलकर, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्या-पका स्वाती होलमुखे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रद्धा माने, मनोहर जोशी महाविद्यालयाच्या प्राचार्या मृणाल रसाळ, मा-जी मुख्याध्यापक पोटे, जगन्नाथ वाघमारे, विलास गोरेगावकर, परशुराम इंगोले, सुरेश सावंत, अंकुश कारंडे आदी या वेळी उपस्थित होते.































































