मुंबईतील वीजपुरवठ्यासाठी महावितरणची याचिका

मुंबईतील कुलाबा ते माहीम, पश्चिम उपनगरात वांद्रे ते दहिसर, पूर्व उपनगरांत विक्रोळी ते चुनाभट्टी आणि मानखुर्द तसेच मीरा-भाईंदर महापालिका या क्षेत्रांत वीज वितरणासाठी परवाना मिळावा, अशी मागणी करणारी याचिका महावितरण कंपनीने राज्य वीज नियामक आयोगाकडे दाखल केली आहे. अदानीसह खासगी वीज कंपन्यांनी राज्यात महावितरणच्या कार्यक्षेत्रात वीज परवान्याची मागणी करणारे अर्ज दाखल केल्याने महावितरणनेही मुंबईत वीज परवान्यासाठी याचिका केली.