धोनी चेन्नईत खेळणार आयपीएलचा शेवटचा सामना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी जगज्जेता कर्णधार आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे नेतृत्व करणाऱया महेंद्रसिंग धोनीने आगामी वर्षीदेखील आपण आयपीएल खेळणार असल्याचे सांगितले आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील निवृत्तीबद्दल बोलताना आपला शेवटचा आयपीएल सामना चेन्नईत खेळणार असल्याचे त्याने म्हटले आहे. याचाच अर्थ महेंद्रसिंग धोनी आगामी हंगामात यलो जर्सीमध्ये खेळताना दिसणार हे आता स्पष्ट झाले आहे.

महेंद्रसिंग धोनी म्हणाला की, ‘निवृत्तीचा सामना पाहायला तुम्ही सर्वजण येऊ शकता आणि मला सीएसकेकडून खेळताना पाहू शकता. चेन्नई स्टेडियमवरच माझा शेवटचा सामना असेल. तुम्हा सर्वांना मला निरोप देण्याची संधी मिळेल. चाहत्यांच्या साक्षीने आणि मैदानावर निवृत्त व्हायलाच मला आवडेल,’ असेही महेंद्रसिंग धोनीने सांगितले.

धोनी किती वर्षे खेळेल सांगू शकत नाही

महेंद्रसिंग धोनीबद्दल बोलताना इंडिया सिमेंटच्या एका अधिकाऱयाने म्हटले, ‘आम्ही धोनीला संघात कायम ठेवणार आहोत. तो पुढच्या वर्षी संघात असेल आणि पुणास ठाऊक तो आणखी काही वर्षे खेळेल. चाहते त्याचा निरोपाचा सामना चेन्नईत पाहू शकतात. मात्र पुढच्या वर्षी त्याचा शेवटचा सामना असेल असे कोणी समजू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.