
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
वेस्ट इंडीज व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेण्टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आलेल्या महेंद्रसिंग धोनीचे हिंदुस्थानच्या संघात कमबॅक झाले आहे. अखिल हिंदुस्थानी सिनियर निवड समितीने सोमवारी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या दौऱ्यातील वन डे मालिकेसाठी तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेण्टी-20 मालिकेसाठी हिंदुस्थानच्या संघांची घोषणा केली. यामध्ये तेज गोलंदाज उमेश यादव, मनीष पांडे यांना डच्चू देण्यात आला असून हार्दिक पांडय़ा, केदार जाधव व दिनेश कार्तिक या तिघांनाही दोन्ही प्रकारच्या संघात निवडण्यात आले आहे.
यष्टिरक्षक रिषभ पंत व कृणाल पांडय़ा यांची ट्वेण्टी-20साठीच निवड करण्यात आलीय. तसेच अंबाती रायुडू, मोहम्मद शमी व रवींद्र जाडेजा यांना फक्त वन डे मालिकेसाठीच निवडण्यात आले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेण्टी-20 मालिकेसाठी तीन यष्टिरक्षक टीम इंडियात असणार आहेत. यामध्ये महेंद्रसिंग धोनीसह दिनेश कार्तिक व रिषभ पंत यांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी चमू
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), हार्दिक पांडय़ा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वरकुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, मोहम्मद शमी.
न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेण्टी-20साठी चमू
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), हार्दिक पांडय़ा, कृणाल पांडय़ा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वरकुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद.



























































