धक्कादायक! कंगनाला महेश भट्ट यांनी चप्पल फेकून मारली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रसिद्ध चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी अभिनेत्री कंगना रनौतला त्यांचा चित्रपट नाकारल्याने चक्क चप्पल फेकून मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘वो लम्हे’ या कंगनाच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या वेळी हा धक्कादायक प्रकार घडल्याचे कंगनाची बहिण रंगोलीने सांगितले आहे. रंगोलीने ट्विट करत याबाबत माहिती दिली.

कंगनाकडून आलिया भट्टवर सतत टिकेचा वर्षाव केला जात आहे. त्यावरून महेश भट्ट यांची पत्नी व अभिनेत्री आलिया भट्टची आई सोनी राझदान हिने कंगनावर ट्विटरवरून टीका केली होती. त्यात सोनी यांनी कंगनाला महेश भट्ट यांनी बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिल्याचा दावा केला. त्यांचे ते ट्विट वाचून कंगनाची बहिण रंगोली भडकली असून तिने महेश भट्ट यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘महेश भट्ट यांनी कंगनाला ब्रेक दिला नाही तर तो अनुराग बासू यांनी दिला आहे. त्या चित्रपटाची निर्मिती करणारे प्रोडक्शन हाऊस हे भट्ट यांच्या भावाचे होते व ते तिथे क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहत होते. वो लम्हे या चित्रपटानंतर भट्ट यांनी कंगनाला त्यांनी लिहलेल्या धोका या चित्रपटाची ऑफर दिली. ज्यात कंगनाला सुसाई़ड बॉम्बरची भूमिका साकारावी लागणार होती. त्यामुळे तिने त्या चित्रपटाला नकार दिला. त्यानंतर भट्ट तिच्यावर ओरडले. त्यांनी वो लम्हे या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला तिला चप्पल फेकून मारली. त्यांनी तिला तिचा चित्रपट देखील पाहू दिला नाही. ती रात्रभर रडत होती. आणि त्यावेळी ती फक्त 19 वर्षांची होती’, असे ट्विट रंगोलीने केले आहे. रंगोलीच्या या ट्विटनंतर सोनी राजदान यांनी त्यांचे ट्विट डिलीट केले आहे.