
सार्थ प्रतिष्ठान आणि शिवसेना शाखा क्र. 198 यांच्या संयुक्त विद्यमाने महेश मधुकर बोभाटे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिनेश बोभाटे यांच्या नेतृतवाखाली 15 ते 18 वयोगटातील मुलांना गुरुवारी गणपतराव कदम शाळा, लोअर परळ येथे मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. तसेच 60 वर्षांवरील नागरिकांना मोफत कोरोना लसीचा तिसरा डोस दिला.
स्वर्गीय महेश बोभाटे फाऊंडेशनच्यावतीने अंध मुले व वयोवृद्धांना आनंद निकेतन येथे स्वेटर वाटप आणि म्हसकर रुग्णालय येथे कर्करोगग्रस्तांना भोजन वाटप करण्यात आले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार सुनील शिंदे, बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, नगरसेविका स्नेहल आंबेकर, शाखाप्रमुख दीपक बागवे, उपविभागप्रमुख राम साळगावकर, विधानसभा संघटक निरंजन नलावडे, समाजसेवक बाळा खोपडे आदी उपस्थित होते.

























































