गोडसेंवर सिनेमा; महेश मांजरेकरांनी केली घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंतीनिमित्त शनिवारी देशभरात विविध उपक्रम राबवत त्यांना अभिवादन करण्यात आले. अशातच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ’गोडसे’ या चित्रपटाची घोषणा केली आहे.

सोशल मीडियावर टीझर पोस्टर शेअर करत मांजरेकरांनी म्हटलेय, ‘‘नथुराम गोडसे हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. या व्यक्तिमत्त्वावर सिनेमा करायचा म्हटले तर प्रचंड धैर्य हवे. मला नेहमी सिनेमातून आव्हानात्मक विषयांवर भाष्य करणे आवडते. नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांच्यावर गोळी चालवली. त्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा झाली अशा मोजक्याच गोष्टी लोकांना माहित आहेत. त्यांच्या आयुष्यावर आम्ही सिनेमातून प्रकाश टाकणार आहोत. ही गोष्ट मांडताना कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. कोण चूक आणि कोण बरोबर हे दाखवण्याचा आमचा हेतू नाही.’’ संदीप सिंग आणि राज शांडिल्य यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून पुढच्या वर्षी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.