मल्टिप्लेक्समधील तिकीट दर 150 रुपयांपर्यंतच ठेवा; महेश मांजरेकर यांच्यासह चित्रपट निर्माते, थिएटर मालकांची मागणी

मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमांना कायमस्वरूपी एक स्क्रीन ठेवावी आणि तिकीट दर 100-150 रुपयांपर्यंतच ठेवावे, अशी मागणी अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासह चित्रपट निर्माते, थिएटर मालकांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत केली.

मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळालीच पाहिजे, असा आग्रह यावेळी धरण्यात आला. राज्यातील मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये मराठी चित्रपट दाखवण्यासाठी धोरण या बैठकीत आखण्यात आले. या बैठकीला मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष व निर्माते अमेय खोपकर, बाबासाहेब पाटील, मेघराज भोसले यांच्यासह मल्टिप्लेक्स थिएटरचे मालक आणि प्रतिनिधी म्हणून मयंक श्रॉफ, पुष्कराज चाफळकर, थॉमस डिसूझा, राजेंद्र जाला उपस्थित होते.