अनिल बिल्वा ‘साहेब चषका’चा मानकरी

187

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देण्यासाठी शिवसेना माहीम विभाग आणि श्री समर्थ सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या ‘साहेब चषक 2020’ शरीरसौष्ठव स्पर्धेला मुंबई आणि आसपासच्या विभागातील शरीरसौष्ठवपटूंचा उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत हर्क्युलिस फिटनेसच्या अनिल बिल्वाने साहेब चषक पटकावला. त्याला रोख 25 हजार रुपये आणि चषकाने माहीम विधानसभा संघटक राजू पाटणकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दैनिक ‘सामना’ या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक होते.

स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे परिवहन मंत्री, विभागप्रमुख ऍड. अनिल परब यांनी श्रीफळ वाढवून केले. स्पर्धेत 150 शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला. स्पर्धेप्रसंगी मुंबई बॉडीबिल्डिंग संघटनेचे सुनील शेगडे, राजेश सावंत, माजी शाखाप्रमुख महेश सावंत, माजी नगरसेवक प्रकाश आयरे, शाखाप्रमुख अजय तामोरे, श्री समर्थचे अध्यक्ष नंदू पवार, सरचिटणीस रेखा पेडणेकर व रमेश पेडणेकर हे मान्यवर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या