
देशातील प्रमुख वाहन पंपनीपैकी एक असलेली महिंद्र अॅण्ड महिंद्रा राज्यात तब्बल 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. महिंद्रा ग्रुपने शुक्रवारी ही घोषणा केली आहे. पुढील दहा वर्षांत राज्यात 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून या गुंतवणुकीचे प्रमुख पेंद्र हे नागपूर राहणार आहे, असे महिंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागपूरमधील प्रस्तावित इंटिग्रेटेड हब हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मॅन्युफॅक्चरिंग हब असेल. हे केवळ एक असेंब्ली लाईन नसेल तर या ठिकाणाहून दरवर्षी 5 लाखांहून अधिक वाहने आणि 1 लाख ट्रक्टर बनवले जातील. या प्लांटमध्ये 2028पर्यंत प्रोडक्शन सुरू करण्याची योजना आहे, असे महिंद्राने म्हटले आहे. महिंद्रा तीन प्रमुख ठिकाणी 2 हजार एकर जमीन खरेदी करण्याची तयारी करत आहे.


























































