
सामना प्रतिनिधी । नांदेड
देवीच्या साडेतीन शक्ती पीठांपैकी मूळपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माहूर येथील रेणुका मातेची नवरात्रोत्सवाच्या पाचव्या माळेला म्हणजेच ललित पंचमीच्या दिवशी अलंकार घालून तसेच फळांची आकर्षक अशी आरास करून विधिवत पूजा, आरती करण्यात आली. पंचमीच्या दिवशी रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. (छाया – महेश होकर्णे, नांदेड)




























































