
शेतीच्या वादातून वैमनस्य वाढून फुले पिंपळगाव येथे झालेल्या तलवारीच्या हल्ल्यात बंडू नारायण गिरगुणे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शहरानजीक असलेल्या फुले पिंपळगाव शिवारात भिमराव व किस्किन साळवे यांची दोन एकर जमीन बंडू गिरगुणे यांनी घेतली होती. त्यावरून दोन्ही बाजूंनी वाद सुरू होता. त्यातूनच शनिवारी रात्री बाराच्या नंतर शेतामध्ये असलेल्या झोपडीत झोपलेल्या बंडू गिरगुणे यास तलवारीने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या डोक्यावर व तोंडावर वार करण्यात आल्याने यामध्ये गिरगुणे गंभीर जखमी झाला. त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत.






























































