माजलगावात सुशील डक यांच्याकडून 700 कुटुंबांना किराणा साहित्य वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण हे आपल्या देशावर आलेली फार मोठी आपत्ती आहे . मात्र या आपत्तीमध्ये हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब लोकांवर संकट कोसळले आहे,अशा लोकांसाठी अनेक हात सरसावले असून कोणत्याही समाजकार्यात कायम मदतीचा हात पुढे करणारे तरुण व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे सुशील डक यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना ठेऊन डक परिवाराचे वतीने 700 गरीब, रोजंदार व वृध्दांना घरी जाऊन गहु , तांदुळ व किराना किटचे वाटप केले. सभापती अशोक डक, अँड भानुदास डक, अजिंक्य डक, यांच्या हस्ते वाटप करण्यात आले . यावेळी बंडू वाकळे, गोपाळ पैंजणे, अवधूत सोळंके, सतीश चाळक, तेजस कुल्थे, रवी वाकळे,यांनी परिश्रम घेतले