माजलगाव – संचारबंदीत हटकल्याने दोन पोलिसांना जबर मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील नाकलगाव येथे संचारबंदीत मटनाचे दुकान सुरु ठेवले म्हणून जाब विचारणाऱ्या दिंदृड पोलिसांवर हल्ला चढवत जबर जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

तालुक्यातील नाकलगांव येथे एक मटनाचे दुकान संचारबंदीत चालु असल्याचे पोलीस विशाल मुजमुले व आकाश जाधव यांना निदर्शनास आल्याने त्यांनी दुकानदारास जाब विचारत दुकान बंद केले. यावेळी पोलिसांनी काठीने मारल्याचा राग मनात धरत काही लोकांनी पोलिसांना बेदम मारहाण केली. तेथे गावकऱ्यांनी सोडवासोडव केल्याने दोन्ही पोलिस बचावले.

जखमी पोलीस विशाल मुजमुले व आकाश जाधव जखमी असल्याने बीड येथे शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान शनिवारी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिंद्रुड पोलीस स्टेशनला भेट दिली.