
इन्स्टाग्राम व फोनद्वारे मुलीचा पाठलाग करून ब्लॅकमेल करणारा आरोपी कृष्णकांत सुभाष वैद्य याला खेड पोलिसांनी पवईत अटक केली आहे. नोव्हेंबर 2024 ते एप्रिल 2025 या कालावधीत अज्ञात आरोपीने त्याच्या व्हॉटस्अॅप मोबाईल क्रमांकावरून फिर्यादीच्या व्हॉटस्अॅपवर अश्लील मेसेज करून तसेच वारंवार फोन करून अश्लील शिवीगाळ, जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच इन्स्टाग्रामचा वापर करून फिर्यादीचे बनावट अकाऊंट काढून त्याद्वारे फोटो व्हायरल करून ब्लॅकमेल केले. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध खेड पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.