इमारतीला आग; 60 जणांची सुटका, भेंडीबाजारमध्ये मोठी दुर्घटना टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भेंडीबाजार येथे एका इमारतीला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत 60 जणांची सुखरूप सुटका केली. यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आगी लागण्याचे सत्र सुरूच आहे. 23 जानेवारी रोजी ताडदेव येथे व 26 जानेवारी रोजी साकिनाका येथे जैन सोसायटीत गॅस गळती होऊन आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. आज शनिवारी भेंडीबाजार येथील एका चार मजली इमारतीमध्ये वीज मीटर बॉक्समध्ये आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत इमारतीतील सुमारे 60 रहिवासी अडकले होते. परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य करून सगळ्यांना सुखरूप बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत एका तासात नियंत्रण मिळविले. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.