
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे 20 मुलांचा मृत्यू झाला. त्यानंतर मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये या कफ सिरपवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर सिरप बनवणाऱ्या कंपनी श्रीसान फार्माचे मालक रंगनाथन गोविंदन यांना अटक केली आहे. या प्रकरणानंतर आता तामिळनाडूची श्रीसन फार्मा कंपनी ईडीच्या रडारवर आहे. सोमवारी ईडीने श्रीसन फार्माशी जोडलेल्या 7 ठिकाणांवर छापे टाकले आहेत.
या फार्मा कंपनीविरोधात केस दाखल करण्यात आली आहे. चेन्नई कोल्डरिफ्ट कफ सिरप प्रकरणासंदर्भात ईडीने पीएमएलए अंतर्गत तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील श्रीसन फार्माच्या सात ठिकाणांवर छापे टाकले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या छाप्यांमध्ये तामिळनाडू ड्रग कंट्रोल ऑफिसच्या उच्च अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांचाही समावेश आहे.