
ठाण्याच्या कोपरी उड्डाणपुलावर बुधवारी एक भयंकर अपघात होता होता टळला. आनंदनगर ते साकेत या उन्नत मार्गाच्या कामादरम्यान शेकडो टनाची महाकाय व्रेन ठाण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर कलंडली. या महाकाय व्रेनचा टॉवर रस्त्यावर आदळण्याआधीच कलंडलेल्या अवस्थेत राहिला. त्यामुळे वाहनचालकांचे धाबे दणाणले, मोठा गोंधळही उडाला. या घटनेमुळे एक मार्गिका काही काळ बंद करण्यात आल्यामुळे कोपरी पुलाच्या मुंबई-ठाणे लेनची वाहतूक रोखून धरण्यात आली. त्यामुळे तुफान ट्रफिक काेंडी झाली. तब्बल आठ तासांनंतर व्रेन हटवण्यात आली. त्यामुळे मुंबईहून कामावरून परतणाऱ्या नोकरदारांनाही कोंडीचा फटका बसला.


























































