सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी ऑफिसच्या टिफिनसाठी बनवा ‘हे’ चविष्ट आणि झटपट पदार्थ

ऑफिसच्या टिफिनसाठी आपण अशा फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश केला पाहिजे. ज्यामुळे शरीराला थंडावा तसेच ऊर्जा मिळेल. पण दररोज काय बनवायचे, विशेषतः ऑफिसला जाण्यासाठी जेवणासाठी काय बनवायचे याबद्दल चिंता सतावते. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी ऑफिसच्या जेवणासाठी काय तयार करायचे असा प्रश्न पडत असेल, तर हे पर्याय सर्वात बेस्ट आहेत.

 

 

पनीर भुर्जी


सकाळी लवकर पनीर भुर्जी बनवू शकता. हा एक चविष्ट आणि आरोग्यदायी पर्याय आहे. भुर्जी बनवण्यासाठी, एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, कांदा आणि हिरव्या मिरच्या घाला आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत नीट परतून घ्या. त्यानंतर यामध्ये चिरलेले टोमॅटो घाला आणि ते मऊ होईपर्यंत शिजवा. नंतर हळद, लाल तिखट, मीठ आणि गरम मसाला घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. तुम्हाला आवश्यक असल्यास त्यामध्ये चिज किसून घाला आणि सर्व मिश्रण 5 ते 6 मिनिटे शिजवा. आता वरून चिरलेली कोथिंबीर घाला आणि सर्व्ह करा.

व्हेज पुलाव

दुपारच्या जेवणासाठी पुलाव देखील बनवू शकता. पुलाव बनवण्यासाठी, तांदुळ चांगले धुवून 30 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. यानंतर, बटाटे आणि कांदे कापून घ्या आणि सोयाबीन पाण्यात घालून उकळवून घ्या. यानंतर, आले आणि लसूण पेस्ट तयार करा. एका कढईत तेल किंवा तूप गरम करा. यानंतर त्यात जिरे, लवंग, वेलची, दालचिनी आणि काळी मिरी घाला. त्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा घालून हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. यानंतर लसूण, हिरवी मिरची आणि आले घाला आणि काही सेकंद परतून घ्या. नंतर त्यामध्ये शिजवून घेतलेल्या भाज्या घालून भिजवलेले तांदूळ घाला. यानंतर, 2 कप पाणी आणि चवीनुसार मीठ घाला आणि चांगले मिक्स करा. 10 ते 15 मिनिटे शिजवून घ्या. आणि गरमागरम सर्व्ह करा.

पालक पनीर 


पालक थंड असतो. यासोबतच, दृष्टी सुधारण्यासाठी आणि अशक्तपणावर मात करण्यासाठी पालक फायदेशीर आहे. अशा परिस्थितीत तुम्ही पालक पनीर बनवू शकता. हे करण्यासाठी, प्रथम पालक स्वच्छ करा आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्या . यानंतर, त्याची पाने गरम पाण्यात टाका आणि 1 ते 2 मिनिटे उकळवून घ्या यानंतर, पालक गाळून घ्या. आवश्यकतेनुसार आले, लसूण, हिरवी मिरची आणि पालक ग्राइंडरमध्ये टाका आणि चांगले बारीक करुन घ्या.त्यानंतर पॅनमध्ये 2 चमचे तेल किंवा तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे घाला आणि जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये तमालपत्र आणि बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या. यानंतर 1 चमचा बारीक चिरलेला लसूण घाला आणि तो तपकिरी होईपर्यंत परतून घ्या. आता चिरलेले टोमॅटो घाला आणि मऊ होईपर्यंत परतून घ्या. यानंतर हळद, मीठ आणि लाल तिखट घाला आणि पनीर घालून ते चांगले शिजवून घ्या. अवघ्या काही वेळातच पालक पनीर तयार होईल.