मेकअप ब्रश कसे वापरायचे?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिवानी गोंडाळ, मेकअप आर्टिस्ट

चित्रकार किंवा मेकअप आर्टिस्ट दोन्हींसाठी योग्य ब्रशचा योग्य ठिकाणी वापर खूप महत्त्वाचा ठरतो. अलीकडे सोशल मीडियामुळे मेकअपबद्दलचा अवेअरनेस वाढल्यामुळे सामान्य स्त्र्ायाही मेकअप ब्रशचा वापर करू लागल्या आहेत. मात्र त्याचा नीट वापर केला नाही तर आपल्याला हवा असलेला लूक मिळत नाही आणि चेहराही खराब दिसतो.

पूर्वी कमीत कमी मेकअप ब्रशचा वापर व्हायचा. मात्र अलीकडे हायजीन म्हणून संपूर्ण मेकअप ब्रशने केला जातो, त्यामुळे मेकअपमधील बारकावेही योग्यरीतीने साधले जातात. सुंदर मेकअपसाठी बाजारात मिळणारे विविध ब्रश वापरताना ते योग्य रीतीने वापरले गेले पाहिजेत. अनेक वेळा जाहिरातींना भुलून ब्रश विकत घेतले जातात. ब्रश हे दोन प्रकारांत मिळतात. एक नॅचरल फायबर किंवा आर्टिफिशियल सिल्क फायबर. ब्रशचे केस हे नॅचरल असणं गरजेचं आहे, सिल्क केस असल्यास पॉलिश्ड, इव्हन लुक देता येत नाही. चांगल्या पंपनीचे ब्रश विकत घेतल्यास मेकअपचा मेळ नीट साधता येतो.

विविध आकाराचे, रंगांचे, ब्रश मिळतात. कोणते ब्रश आपण नेहमी वापरायचे किंवा आपल्या मेकअप किटमध्ये कुठले ब्रश हवेत याची सविस्तर माहिती करून घेणे फार गरजेचे असते.

तुमच्या नेहमीच्या किटमध्ये पाच ब्रश हवेत. दोन फेससाठी तर तीन आयमेकअपसाठी किंवा ब्लश ब्रश घेतला तरी तो मल्टीटास्कर म्हणून वापरता येईल.
फेससाठी फ्लॅट ब्रश ः हा फ्लॅट असल्यामुळे फाऊंडेशन व पावडर दोन्ही नीट पसरली जाते. फाऊंडेशनसाठी बफर ब्रश येतो, पण फ्लॅट ब्रशसुद्धा हेच ब्लेब्डिंग नीट करू शकतो.

फेससाठी ऑगुलर ब्रश – याने कॉन्ट्रर, ब्लशर, हाय लायटर लावू शकतो.
आयमेकअपसाठी ब्लेब्डिंग ब्रश – ज्याला फ्लपी ब्रशही म्हणतात. आयशॅडो ब्लेड होण्यास मदत होते व क्रीज दिसण्यासाठी मदत होते.
आयशेडिंग ब्रश -जो आयशॅडो नीट पसरविण्यास मदत करतो.
पेन्सिल ब्रश -ज्याचा वापर आऊटर कॉर्नर व लोवर lash साठी करू शकता. तर कधी आयलायनर काढण्यासाठीही. Mac, Morphe, Sigma, Pac, B & D, Pro Art चे
ब्रश तुम्ही घेऊ शकता.
हे झाले नेहमी वापरण्याचे ब्रशेस. ज्याने तुम्हाला पटकन आणि संपूर्ण मेकअप करता येऊ शकतो. पुढील लेखात आपण प्रोफेशनल ब्रश आणि त्यांची माहिती घेऊया.