#AYODHYAVERDICT- राम मंदिराचे काम हे राष्ट्र बांधणीचे कार्य, आडवाणींची पहिली प्रतिक्रिया

1005

अयोध्या प्रकरणी निकाल आल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या अंदोलनात आपला सहभाग होता हे आपल्या भाग्य होते असे आडवाणी यांनी म्हटले आहे. तसेच राम मंदिर निर्माणाचे काम हे राष्ट्र बांधणीचे कार्य आहे असेही ते म्हणाले.

आडवाणी म्हणाले की, “अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मी खूप आनंदी आहे. मी देशवासियांच्या आनंदात सहभागी आहे. स्वातंत्र्य चळवळीनंतरचे राम मंदिरचे आंदोलन सर्वात मोठे आंदोलन होते. या आंदोलनात माझा सहभाग होता याचा मला आनंद आहे.”

अयोध्येत जे राम मंदिर उभारले जाईल ते राष्ट्र बांधणीचे कार्य असेल. हिंदुस्थान आणि जगभरात राहणार्‍या कोट्यवधी हिंदुच्या हृदयात राम जन्मभूमीसाठी विशेष जागा आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या