मलायका आणि अर्जुन कपूर एप्रिलमध्ये करणार लग्न?

14

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्यामध्ये सुरू असलेल्या गुटरगूच्या नात्याला नवे नाव मिळणार आहे. दोघेही एप्रिलमध्ये लग्न करण्याची शक्यता आहे. तसेच हे लग्न ख्रिश्चन रिती-रिवाजांनी होईल अशीही चर्चा सध्या ब़ॉलिवूडमध्ये सुरू आहे.

अरबाजसोबत वाजल्यानंतर मलायका पहिल्यांदा बोलली, म्हणाली आमच्यामुळे …

अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका हिचे सूत अभिनेता अर्जुन कपूरसोबत जुळल्याचे दिसले. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे दिसले, परंतु दोघांनीही सार्वजनिकरित्या आपल्या नात्यावर बोलण्याचे नेहमीच टाळले आहे. परंतु आता डेक्कन क्रोनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे समजते.

होय मला मलायका आवडते! अखेर ‘त्याची’ जाहीर कबुली

दोघे एप्रिलमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार असल्याचेही वृत्तामध्ये म्हटले आहे. अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हे लग्न होईल असेही त्यांनी म्हटले आहे. याआधी मलायका अरोरा हिची बहीण अमृता अरोरा हिने देखील पती शकील याच्यासोबत ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले आहे.

याआधी मलायका अरोडा हिने करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या कॉफी अवॉर्डमध्ये मलायकाने मला अर्जुन पसंद असल्याचे म्हटले होते. सध्या हे दोघे स्वित्झर्लंडमध्ये आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा प्री-वेडिंग सेरेमनी सहभागी झाले आहेत. दोघांचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या