
मुंबईत यावर्षी जून ते 15 सप्टेंबर या कालावधीत मलेरियाचे 5985 रुग्ण आढळले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ जास्त आहे. जून ते 15 सप्टेंबर 2025 या कालावधीत मुंबई आणि उपनगरांत मलेरियाचे 4306 रुग्ण आढळले होते. तर डेंग्यू, लेप्टो, चिकनगुनिया, गॅस्ट्रो, कोविड या रुग्णांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या संख्येत घट झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले. सध्या अधेमधे पाऊस सुरू असल्यामुळे नागरिकांनी आपल्या घरामध्ये, घराच्या आजूबाजूला व इमारतींच्या परिसरात कुठेही पाणी साचलेले असणार नाही, याची दक्षता घ्यावी. साचलेले पाणी आढळून आल्यास असता तत्काळ निचरा करावा व खास दक्षता घ्यावी, अशा सूचना पालिकेने केल्या आहेत.

























































