परदेशातून भ्रूणची तस्करी करणार्‍याला कोर्टाचा दणका

386
mumbai-highcourt

मलेशियाहून भ्रूण आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तस्करला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास आज नकार दिला. अर्भकाची तस्करी करणे हा गुन्हा असून याचिकाकर्त्याला पासपोर्ट दिल्यास तो आपल्या देशात पळून जाऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशी कार्यात अडथळे येतील असे स्पष्ट करत न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी संबंधिताला पासपोर्ट परत न करण्याचे सरकारला आदेश दिले.

मलेशियन नागरिक असलेल्या पार्थबन दुराई हा तस्कर असून 15 मार्च रोजी मलेशियाहून त्यांनी वांद्रे येथील एका आयव्हीएफ सेंटरमध्ये भ्रूण आणले. याप्रकरणी महसूल गुप्तवार्ता महासंचालनालयाच्या अधिकार्‍यांनी 16 मार्चच्या रात्री क्लिनिकवर धाड टाकली व कागदपत्रे जप्त केली. याप्रकरणी दुराई याला अटकही करण्यात आली. त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. तब्बल आठ वेळा हा तस्कर हिंदुस्थानात आल्याचे लक्षात येताच शासनाने त्याचा पासपोर्ट जप्त केला. अधिकार्‍यांकडे 30 हजार भरल्यानंतर त्याला सोडण्यात आले, परंतु पासपोर्ट जप्त करण्यात आला. हा पासपोर्ट मिळावा यासाठी त्याने हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या