महिला सहकाऱ्याबरोबर नाश्ता केला, तरुणाची तुरुंगात रवानगी

18

सामना ऑनलाईन। रियाध

सौदी अरेबियात एका हॉटेल कर्मचाऱ्याला महिला कर्मचाऱ्याबरोबर नाश्ता करणे चांगलेच महागात पडले आहे. तो मूळचा इजिप्तचा रहीवासी असून सौदीतील हॉटेलमध्ये वेटर आहे. काही दिवसांपूर्वी त्याने महिला कर्मचाऱ्याबरोबर नाश्ता करतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. हे कृत्य अश्लील असल्याची टीका होत आहे. यामुळे तरुणाची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

या व्हिडीओमध्ये तरुण एका बुरखाधारी महिलेबरोबर नाश्ता करत असून ती महिला त्याला घास भरवत असताना दिसत आहे. यावरून सौदी अरेबियात खळबळ उडाली आहे. कट्टर मुस्लीम राष्ट्र असलेल्या सौदी अरेबियाच्या कायद्यानुसार हे कृत्य अश्लील असल्याने तरुणाला कडक शासन करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच संबंधित तरुणाला जेढ्ढा येथून अटक करण्यात आल्याचे टि्वट सौदी अरेबियाच्या श्रम मंत्रालयाने केले आहे.

सौदी अरेबियात महिला व पुरुषांसाठी कडक नियम आहेत. ऑफिसेस पासून हॉटेलपर्यंत वावरताना येथील महिला व पुरुष एकमेकांपासून अंतर ठेवून असतात. सौदी अरेबियात महिला घरातील पुरुषाशिवाय एकट्या बाहेर पडू शकत नाहीत. दरम्यान, ज्या हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे त्या हॉटेल मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला व पुरुषांना एकत्र काम करण्यास लावल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

summary-saudi-arabia-male waiter-had breakfast–with-women-arrested

आपली प्रतिक्रिया द्या