मालेवाडीच्या रेल्वे रुळावरील रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार

सामना ऑनलाईन । परळी वैद्यनाथ  

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मालेवाडीच्या रेल्वे रुळावरील रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना  रेल्वे विभागाकडून अनेक अडचणींना सोमोरे जावे लागत आहे. अनेक वेळा हा मार्ग बंद केला जातो त्यामुळे नागरिकांना ये – जा करण्यासाठी  रेल्वे फाटक किंवा उड्डान पुलाची मागणी होत आहे. मात्र त्याकडे प्रसासनाकडून दुर्लक्ष केलं जात होतं.

गेल्या 20 ऑगस्ट रोजी रेल्वे अधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेत हा रस्ता बंदकरण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या, त्यामुळे  सदर घटनेची माहिती  नागरिकांनी  खासदार प्रीतम मुंडे यांना दिली. खासदार मुंडे यांनी याबाबत तातडीने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून रस्ता बंद न करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे लवकरात लवकर येथे उड्डान पुल बांधून या समस्येवर कायमस्वरूपी  तोडगा काढण्यात येणार असल्याचे खासदार प्रीतम मुंडे यांनी आश्वासन दिले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.