दिल्लीत सोमवारी विरोधी पक्षनेत्यांची बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोमवार, 29 नोव्हेंबर रोजी सर्व विरोधी पक्षांची दिल्लीत बैठक होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी ही बैठक बोलावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कॉँग्रेसकडून संसदेच्या अधिवेशनात मांडण्यात येणाऱया मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी पक्षाच्या संसदीय धोरण गटाची बैठक गुरुवारी पार पडली. कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत एमएसपीला कायदेशीर हमीसह शेतकरी संघटनांच्या मागण्या, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ करण्याची मागणी, महागाई, सीमेवर चीनची आक्रमकता आणि पेगॅसस हेरगिरी यावरून सरकारला घेरण्याची रणनीती आखण्यात आली.