मल्ल्याला ‘फरार’ घोषित करता येणार नाही; वकिलांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
बँकांना लुटून देशातून पळून गेलेल्या विजय मल्ल्याच्या खर्चाचा तपशील उघड झाला आहे

सामना ऑनलाईन।  नवी दिल्ली

मद्यसम्राट विजय मल्ल्या हा कायदेशीररीत्या देशाबाहेर गेला आहे. तसेच त्याला हिंदुस्थानातील न्यायालयाच्या वॉरंटआधारे ब्रिटनमध्ये अटक झालेली आहे. त्यामुळे त्याला ‘फरार’ घोषित करता येणार नाही, असा युक्तिवाद मल्ल्या याच्या वकिलाने शुक्रवारी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉण्डरिंग ऍक्ट कोर्टात केला.

मल्ल्या याने वॉरंट निघण्यापूर्वीच देश सोडला आहे. त्यामुळे फौजदारी कारवाई टाळण्यासाठी त्याने पलायन केले असे म्हणता येणार नाही. शिवाय देशाबाहेर जाण्याचा अधिकार त्याला राज्यघटनेनुसार आहे, असे त्याचे वकील अमित देसाई यांनी सांगितले.

विजय मल्ल्या याने सरकारी बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून पलायन करून लंडनमध्ये बस्तान ठोकले आहे. ब्रिटनने मल्ल्या याला हिंदुस्थानच्या ताब्यात द्यावे यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.