देशात पहिल्यांदाच! आदिवासींना मोफत तुरडाळ आणि खाद्य तेल वाटपास सुरूवात

414

कुपोषण रोखण्यासाठी राज्य सरकारने आदिवासी कुटुंबांना मोफत तूरडाळ आणि खाद्य तेल देण्यास सुरुवात केली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार व मोखाडा तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी 2 किलो तुरडाळ व 1 किलो खाद्य तेल मोफत देत या पथदर्शी प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे. राज्य स्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या हस्ते याची सुरुवात करण्यात आली.

‘भूक’ हे कुपोषणाचे मुख्य कारण आहे. ही बाब डोळ्यासमोर ठेऊन या पथदर्शी प्रकल्पाची आखणी करण्यात आली. आदिवासी विकास विभागाने आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाने एकत्र येत या प्रकल्पासाठी 6 कोटी रुपयांची तरतूद करून दिली. जव्हार व मोखाडा तालुक्यातील 40192 आदिवासी नागरिकांना या पथदर्शी प्रकल्पात समाविष्ट करून घेण्यात आलं आहे. ही योजना 6 महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. या योजनेमध्ये गैरव्यवहार होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. ही तूरडाळ आणि तेल जर कोणी काळ्या बाजारात विकण्याचा प्रयत्न केला तर अशा दुकादारांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात येतील असे विवेक पंडीत यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या