सैन्यभरतीच्या परीक्षेत गैरप्रकार; दोघांना पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगरमध्ये लष्कराच्या विविध पदांच्या भरतीसाठी आयोजित लेखी परीक्षेत इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या आधारे कॉपी करताना दोन परीक्षार्थींना लष्कराच्या अधिकाऱयांनी रंगेहाथ पकडले असून, त्यांच्यावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेले दोन्ही उमेदवार हरियाणा राज्यातील आहेत.

रवि रमेश संधू (वय 22, जि. हिस्सार, हरियाणा) व पूजा सुरेंद्र जलंदरा (वय 22, जि. जिढप, हरियाणा) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत कर्नल एल. सी. कटोजा (रा. मिलिटरी हॉस्पिटल, भिंगार) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.