मालवण – बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत सापडला

375
फोटो प्रातिनिधीक

bodyमालवण

 कोळंब येथून बुधवारी पहाटे बेपत्ता झालेल्या विठ्ठल डिचोलकर ( वय 25 ) या तरूणाचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत गुरुवारी सकाळी आढळला. याबाबत मालवण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

कोळंब येथील विठ्ठल डिचोलकर हे काल पहाटे चार वाजता घरात कोणालाही न सांगता निघून गेले. ते नेहमी सकाळी वॉकसाठी जात असत. ते उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा शोध घेतला. गावातील लोकांनीही शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सापडले नाहीत. गुरुवारी सकाळी त्यांचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या एका विहिरीत तरंगत असल्याचे स्थानिकांना दिसून आला. मालवण येथील आपत्कालीन ग्रुप व ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढला.

याबाबत मालवण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत पेडणेकर हे तपास करत आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या