मालवणात सागरी जलतरण स्पर्धेचा थरार

413

महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या वतीने दहावी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा रविवार 15 डिसेंबर रोजी ‘चिवला बीच’ मालवण येथे संपन्न झाली. 29 जिल्ह्यातून 1 हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धकांसह दिव्यांग, गतिमंद (80 स्पर्धक), 60 वर्षावरील जेष्ठ स्पर्धक तसेच सहा ते आठ वर्षे वयोगटातील 250 स्पर्धक सहभागी झाले. राज्यभरातील हजरो स्पर्धकांच्या सहभागाने चिवला बीच गजबजून गेले.

सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या विद्यमाने मालवण चिवला बीच येथे आयोजित दहाव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे उदघाटन रविवारी सकाळी 7 वाजता झाले. उदघाटन प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना अध्यक्ष डॉ. दीपक परब यांच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले. तर आमदार वैभव नाईक यांनी समुद्रात फ्लॅग दाखवताच पाच किलोमीटरचे स्पर्धक समुद्रात झेपावले. तब्बल तीन तास स्पर्धा सुरू होती.

यावेळी राष्ट्रीय लाईफ सेविंग सोसायटीचे युसूफ चुडेद्रा व टीमची मोलाची मदत, स्थानिक पर्यटन होडी वाहतून, मालवण पालिका, लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वी रित्या पार पडली. रुग्णवाहिका, जीवरक्षक, यासह अन्य सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या