मालवणातून हापूस आब्यांची पहिली पेटी कोल्हापूरला रवाना

622

मालवणातील कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार सूर्यकांत ऊर्फ आबा फोंडेकर यांच्या बागेतून हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला रवाना करण्यात आली आहे. यावर्षी आंबा हंगाम काहीसा लांबण्याची शक्यता असताना तालुक्यातुन जानेवारी महिन्यात हापूसची पहिली पेटी कोल्हापूर मार्केटला पाठविण्यात आली आहे.

अवकाळी पावसामुळे यावर्षी आंब्याचे पीक उशिराने येण्याची शक्यता आंबा बागायतदारांमधून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, कुंभारमाठ येथील फोंडेकर यांच्या बागेतील ऑक्टोबर महिन्यात आलेल्या मोहोराचे योग्य पद्धतीने संगोपन करण्यात आले. जानेवारी महिन्यात मोहराचे फळात रुपांतर झाले आहे. त्यामुळे त्यांच्या बागेतून चार डझन हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूर बाजारात पाठविण्यात आली आहे. गेल्यावर्षीही फोंडेकर यांनी जिल्ह्यातून सर्वप्रथम हापूस आंब्याची पेटी बाजारात पाठवली होती. ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे अनेक आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात मोहोर गळून गेल्याने आंबा हंगाम लांबणीवर पडला आहे. आता आंबा हंगाम एक टप्प्यात न होता तीन ते चार टप्प्यात विभागला जाणार असल्याचे बागायतदारांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या